पत्रकाराने निर्भीडपणे पत्रकारिता केली पाहिजे, केशव गरकळ यांचे प्रतिपादन.
पत्रकाराने निर्भीडपणे पत्रकारिता केली पाहिजे, केशव गरकळ यांचे प्रतिपादन.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंग ठाकूर
------------------------------------
येथील उत्तमचंद बागडिया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर रिसोड तालुक्यातील मुंगसाजी नगर येथे आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रमोद कुमार नंदेश्वर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदयवार्ता न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी केशव गरकळ होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.ड्रॉ.अतुल खोटे, रा.से.यो.प्रमुख संजय टिकार,प्रा. किरण बुधवत,प्रा.कोमल काळे मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शन करताना पत्रकार केशव गरकळ यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिरार्थी हा वाहत्या नदीच्या प्रवाहासारखा असला पाहिजे, त्याने समाजातील नकारात्मक विचाराचा नायनाट करून सकारात्मक विचार समाजात रुजविलेे पाहिजेत, तसेच पत्रकार हा निर्भीड असतो तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्य जनतेवर झालेल्या अन्यायांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, वेळप्रसंगी तो आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.अध्यक्षीय भाषण करताना प्रा. अतुल खोटे यांनी सांगितले की, पत्रकार हा समाजातील अन्यायांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो तसेच न्याय मिळवून देताना पत्रकार हा कोणताही जात धर्म न पाहता आपल्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रमोद कुमार नंदेश्वर यांनी उपस्थित रा.से.योच्या शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्राध्यापक संजय टिकार, प्राध्यापक किरण बुधवंत, प्राध्यापक कोमल काळे यांच्यासह सर्व स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजिंक्य बोरुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदिनी डिंडरकर हिने केले.
Comments
Post a Comment