Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नव्या युगाचा नवा शिक्षक बना- डॉ. कमळकर.

 नव्या युगाचा नवा शिक्षक बना- डॉ. कमळकर.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

-----------------------------------

      नव्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अतिरिक्त एक भाषा शिकवावी लागणार आहे. नविन शैक्षणिक धोरण आव्हान न समजता नव्या आव्हानावर स्वार होऊन नव्या युगाचा नवा शिक्षक बना असे आवाहन गटाशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी मुरगूड विद्यालयात केले.

          स्वागत व प्रास्ताविक विषयतज्ज्ञ शहाजी पाटील यांनी केले. अनिल हासबे यांनी आभार मानले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अंतर्गत डायट कोल्हापूर आणि पंचायत समिती कागल शिक्षण विभाग आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ९वी ते १२ वी इयत्तेस अध्यापन करणारे शिक्षक- शिक्षिका या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित होते.

          या प्रशिक्षण शिबिरामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनिल हासबे यांनी कृती संशोधन आणि नवोपराक्रम, धनाजी सातपुते यांनी 21 व्या शतकातील कौशल्य व भविष्य वेधी शिक्षण, महेश माने यांनी अंतर समवाय क्षेत्रे, रामचंद्र म्हातुगडे यांनी शाळा आधारित व क्षमता आधारित मूल्यांकन या विषयावर मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments