पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयाचे कोणतेही आदेश नाहीत.

 पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयाचे कोणतेही आदेश नाहीत.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार

--------------------------------

न्यायालयाने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस स्टेशन लोहा यांना आदेशित केले आहे अशा आशयाची बातमी काल एका ऑनलाईन पोर्टलवर प्रसारित केली होती.

 मात्र सदरची बातमी ही खोटी असून लोहा न्यायालयाने पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करा असे कोणतेही आदेश काल रोजी दिलेले नाहीत.


 सराईत आरोपी चंद्रकांत क्षीरसागर याच्यावर लोहा पोलीस स्टेशन येथे चार गुन्हे दाखल असून त्याचा तडीपरीचा प्रस्ताव लोहा पोलिसांनी पाठवलेला आहे.


 चंद्रकांत शिरसागर याने लोहा न्यायालयामध्ये पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या बद्दल तक्रार केलेली होती सदरची तक्रार दि.7/3/24 रोजी करण्यात आली होती सदरची तक्रार न्यायालयाने चौकशी मध्ये घेतली असून सदरची तक्रार हे खरी आहे का खोटी आहे हे तपासण्यासाठी व्हेरिफिकेशन साठी ठेवलेली होती त्यामध्ये पुन्हा 12/3/24 तारीख देण्यात आली होती पुन्हा त्यात 18/3/24 तारीख ठेवण्यात आली होती.

 यामध्ये पुन्हा 18 तारखेला माननीय न्यायालयाने 20/4/24 ही तारीख पुन्हा सुनावणीसाठी ठेवलेली आहे.

 अजून या प्रकारात न्यायालयाने कोणताही अंतिम आदेश दिलेला नाही. याची पुढील तारीख 20/4/ 24 आहे.

 दिनांक 18/3/24 रोजी न्यायालयाने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस स्टेशन लोहा यांच्याकडे कोणतेही आदेश पाठवलेले नाहीत.

 गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत ही बातमी खोटी आहे.

 पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 197 प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1949 कलम 159,160,161 प्रमाणे संरक्षण दिलेले आहे.

 या कलम अन्वये पोलिसांविरोधात कोणताही दावा किंवा कोणताही खटला डायरेक्ट दाखल करता येत नाही. न्यायालयाला पण पोलिसा विरोधात लोकसेवकाविरोधात किंवा स्वतः न्यायालयाच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून घेता येत नाही.

 जर अशी कारवाई करायचीच असेल तर त्यासाठी पोलीस विभागाकडून 197 सीआरपीसी प्रमाणे पोलीस विभाग प्रमुखांकडून रीत सर परवानगी घ्यावी लागते.

 म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रथम चौकशी हे पोलीस विभागातर्फेच केली जाते.


 आता या संबंधाने जे प्रकरण लोहा न्यायालयामध्ये आहे त्या संबंधाने कोणताही अंतिम आदेश झालेला नाही त्याची पुढील तारीख २०/४/२४ आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.