Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांनी राबविली रिसोड बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम.....!

 श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांनी राबविली रिसोड बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम.....!

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित.ठाकुर.

---------------------------------

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाच्या अनुषंगाने रिसोड बसस्थानक व परिसरात एस.टी.महामंडळ रिसोड व श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रिसोड आगाराचे आभार प्रमुख श्री डी.के.दराडे, श्री.शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख, उपमुख्याध्यापक संजयराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याला अनुसरून सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, बस स्थानक परिसर स्वच्छ असावा या उदात्त हेतू मधून ही मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसरातील कचरा, कागद, प्लास्टिक बाटल्या, पालापाचोळा, जमा करून ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण केले. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सर्व परिसर स्वच्छ व सुंदर केला परंतु विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश बस स्थानक परिसरातील सर्व प्रवाशांना दिला. स्वच्छ भारत स्वस्थ भारत, ही काळाची गरज असून प्रत्येकाने स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. स्वच्छता आणि गुणवत्ता एकमेकांशी निगडित असून, स्वच्छता मानवाच्या जीवनावर तसेच गुणवत्तेवर खोलवर परिणाम करते, मानवाचे आरोग्य सुधारते, प्रदूषण कमी होते. पर्यावरणाची गुणवत्ता राखली जाते, प्रवाशांनीही या स्वच्छता अभियान चळवळीचा भाग बनून कार्य करत राहावे आपल्या घराप्रमाणेच आपण ज्या बसमधून प्रवास करतो ती बस ही स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीही आपल्याकडून होतील तितके प्रयत्न करावेत हा संदेश यामधून दिला गेला. या अभिनव उपक्रमाबद्दल श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यामध्ये मोलाची भूमिका श्री विनोद बावणे, प्रा.अभिजीत देशमुख, श्रीमती शिवकन्या गाडेकर, श्री पांडुरंग वाळले, श्री गजानन मोरे, श्री दर्शन सरनाईक, यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments