Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रफुल्लीत केंद्रामार्फत भाविकांना फळे वाटप.

 प्रफुल्लीत केंद्रामार्फत भाविकांना फळे वाटप.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर प्रतिनिधी 

---------------------------------

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणार्‍या प्रफुल्लीत केंद्रामार्फत जोतिबाच्या पाचव्या खेट्याला जोतिबा वेळ भाविकांना फळे वाटप करण्यात आली. 

रविवारी जोतिबाचा शेवटचा खेटा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी उन्हाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रफुल्लीत केंद्राच्या टीमने पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी भाविकांना फळे वाटप करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला भाविकांनी या उपक्रमाबद्दल धन्यवाद मानून समाधान व्यक्त केले.

यावेळी प्रफुल्लीत केंद्राचे संस्थापक प्रफुल्ल पाटील, मेन राजाराम हायस्कूलच्या व्यवसाय शिक्षिका दिपाली पाटील, प्रिन्स पाटील, राजवर्धन आबदार, श्रावणी लाड, अरुणा लाड, रेश्मा कातकर, साक्षी कांबळे, सिद्धेश चिले, बिस्मिल्ला नदाफ हे उपस्थित होते प्रफुल्लीत केंद्राच्या संचालिका बागवान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments