Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा कार्यालय पाचवड येथे अण्णासाहेब पाटील यांचा स्मृतीदिन साजरा.

 अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा कार्यालय पाचवड येथे अण्णासाहेब पाटील यांचा स्मृतीदिन साजरा.

-------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी 

शेखर जाधव

-------------------------

महाराष्ट्र सरकारने जर " मराठा समाजाला सूर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर नाही केले " तर दुसर्‍या दिवशीचा सुर्य हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही... ही भिष्मप्रतिज्ञा लाखो लोकांच्या समोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ रोजी घेतली.शपथ घेत असताना कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या एका डोळ्यात अश्रु तर दुसर्‍या डोळ्यात अंगार होता... की लाखो मराठा समाज एकञ येऊन सुद्धा निर्लज्ज सरकार आपली एकही मागणी मान्य करत नाही...

   २३ मार्च १९८२ रोजी सकाळी या मराठयांच्या क्रांतीसुर्याने आपला शब्द खरा करून दाखवला... त्यांनी आपल्या राहत्या घरी आमदार असताना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या मेंदूत रिव्हॉल्वर ने गोळी झाडून घेतली. अशा मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे मराठ्यांचे पहिले क्रांतीसुर्य ,सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माथाडी कामगारांचे नेते, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या स्मृति दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा सातारा चे वतीने पाचवड येथे विनम्र अभिवादन करणेत आले . त्यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे म्हणाले

       अण्णासाहेब पाटील यांचा आचार, विचार तळागाळापर्यंत पोहोचवा तसेच मराठा बांधवांसाठी असणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून योजनांची माहिती सर्व सामान्यां पर्यंत पोहोचवणे चे काम सर्वांनी करणे गरजेचे आहे

सदर कार्यक्रमास अखील भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हा 

सरचिटणीस जितेंद्र भोसले, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी ,बाळासाहेब साळवी ( महाबळेश्वर ) ,जावली तालुका अध्यक्ष दादा करंदकर, कार्याध्यक्ष विलास दरेकर, जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष अनिल करंदकर, नवदर्पन चे संदिप पवार ,जावली प्रिंट मिडीया अध्यक्ष सुनिल धनावडे , मेढा/ केळघर विभाग प्रमुख शेखर जाधव , तसेच जिल्हयातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते


फोटो - अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचा सत्कार करताना जिल्ह्यातील पदाधीकारी


❌चौकट

       जावळी तालुक्यातील हातगेघर गावांमध्ये कै. अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ४२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, हातगेघर गावचे सरपंच सौ. प्रमिला राजेंद्र गोळे त्यांचे सहकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजपा तालुका प्रमुख श्रीहरी गोळे तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ तरूण वर्ग उपस्थित होता

Post a Comment

0 Comments