Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथे आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न.

रिसोड येथे आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड. प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर.

-------------------------------

 समता. पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व लॉयन्स क्लब ऑफ रिसोड मिडटाऊन च्या वतीने मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी आयुष्यमान भारत कार्ड व ई श्रम कार्ड शिबिर मस्के बालरुग्णालय येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घघाटन लॉयन्स क्लबचे अध्यक्ष लॉ.माधव मस्के यांच्या हस्ते झाले. सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डद्वारे मोठे आजार, शस्त्रक्रिया व इतर उपचारासाठी 5 लक्ष रुपयापर्यंतचे उपचार भारत सरकार द्वारे सरकारी व खाजगी रुग्णालयात करण्यात येतात. प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचें आयुष्यमान कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन लॉ.डॉ.माधव मस्के यांनी केले. याप्रसंगी लॉ. कमलकाका बगडिया, लॉ. प्रभाकर पाटील, लॉ.संतोष सोनुने, लॉ. मधुकर देशमुख, लॉ. गजानन बानोरे, लॉ.अजय पाटील, लॉ. संतोष वाघमारे उपस्थित होते. शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी व समता फाउंडेशनच्या टीमने. परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments