रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील गायत्री रंजवे हिचा संघर्षमय प्रवास.

 रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील गायत्री रंजवे हिचा संघर्षमय प्रवास.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

--------------------------------

प्रत्येक वादळ पेलेन मी आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन पाठीवरती आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी, सह्याद्री सारखी ताट उभी आहे मी# असे गायत्री रंजवे हिच्या बाबतीत म्हटले तर वावगे ठरू नये.गायत्री सुभाष रंजवे ही रिसोड तालुक्यातील भोकरखेडा या छोट्याशा गावात राहणारी मुलगी परंतु जिद्द चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वास याच्या जोरावर तिने यशाचे शिखर गाठले.गायत्री रंजवे हिने खडतर व संघर्षमय प्रवास करीत आपल्या आई वडिलांचे स्वप्नच नव्हे तर वाशिम जिल्ह्याचे नाव प्रकाश झोतात आणले.गायत्री रंजवे हिने खडतर व संघर्षमय प्रवासातून अभ्यास करीत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये भारतामध्ये 21 रॅक तर ओबीसी गटातून दुसरा क्रमांक प्राप्त केला.विशेष म्हणजे गायत्री रंजवे हिचे वडील  सुभाष रंजवे हे सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे.विशेष म्हणजे सुभाष रंजवे यांनी आपल्या गरीब परिस्थितीची मुलीला जाणीव न होऊ देता तिच्या शिक्षणासाठी अहोरात्र झाडाच्या सावलीप्रमाणे तिच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचेच फलित म्हणून तिने यशाचं शिखर गाठलं.जीवनामध्ये प्रत्येक माणूस यशस्वी होतो फक्त गरज असते त्याला प्रेरणा देण्याची त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याची आणि तेच कार्य गायत्री रंजवे हिच्या आई-वडिलांनी केले.विशेष म्हणजे गायत्री रंजवे हिने मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण करीत इंग्रजी भाषेला आपलंसं करून घेतलं.गायत्री रंजवे हिच्या या यशस्वी वाटचाली बद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.ज्याच्या मनगटात संघर्ष करण्याची जिद्द आहे तो जीवनातील कोणतेही शिखर गाठू शकतो.जिद्द,चिकाटी,मेहनत व आत्मविश्वास याच्या जोरावर माणूस यशस्वी होतो असे गायत्री रंजवे हिने सत्काराला उत्तर देतांना सांगितले.तिच्या या यशाबद्दल रिसोड येथील महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने गायत्री रंजवे हिचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.