Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी.

 लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

------------------------------------

सांगली दि 27 (जी .मा .का) लोकशाही बळकटीकरणांमध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी स्वीप (SVEEP ) 

कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती वर भर देण्यात येत आहे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी इयत्ता 7 मे रोजी मतदान होत आहे सर्व मतदारांनी लोकशाही बळकटी करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी यावेळी केले .

मतदान जनजागृती साठी उपक्रमांतर्गत आज सकाळी सात वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती 

धोडमिसे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल महानगरपालिका आयुक्त वैभव साबळे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी हादरलोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर श्री बोर्डस अरुण लोंढे यासह शासकीय अधिकारी कर्मचारी सायकल पट्टू क्रीडा प्रेमी नागरिक विविध शाळा विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली...

Post a Comment

0 Comments