साखर कामगाराची मुलगी बनली तहसीलदार खुपीरे गावातील तहसीलदारपदी निवड होणारी रेश्मा निकम पहिली मुलगी.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------
कोपार्डे -लहानपणापासूनच एमपीएससी होऊन प्रशासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय, त्याला आई सुनिता ववडिल खंडेरावनी दिलेले प्रोत्साहन यामुळे खुपीरे (ता. करवीर) येथील रेश्मा खंडेराव निकम या साखर कामगाराच्या मुलीने तहसीलदार पदाला गवसणी घालून अभिमानस्पद यश मिळवले आहे.खुपीरे गावातील पहिली तहसीलदार बनल्याने गावात रेश्मावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
दोन मुली व एक मुलगा अशी खंडेराव यांना अपत्य.रेश्मा कुटुंबातील दुसरी मुलगी. शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकाने पास होणारी मुलगी.पद्माराजे हायस्कूल मध्ये माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या रेश्माने १० वीची परिक्षा ९४ टक्के गुण मिळवले. पण एमपीएससीच्या परिक्षेला शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर आवश्यक असल्याने रेश्माने स्पर्धा परिक्षेबरोबर प्लँन बी म्हणून इलेक्ट्रॉनिक अँण्ड टेलीकम्युनिकेशनचा डिप्लोमा कोल्हापूर गव्हर्मेंट कॉलेज मध्ये व २०१४ला तीन वर्षाची डिग्री पुण्यातील गव्हर्मेंट काँलेज मधून डिस्टींक्शन मध्ये पूर्ण केली.नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध असूनही रेश्माने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
रेश्माला २०१८ मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले.२०२१ला मुलाखती पर्यंत मजल मारली पण अपयश आले.दररोज १४ ते १५ तास अभ्यास सुरु ठेवला. अखेर चौथ्या प्रयत्नात २०२२ मध्ये रेश्माने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले.तिचे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न होते.पण ही संधी एकदोन गुणाने हुकली. तिला तहसीलदार पदाचे नियुक्ती पत्र गुरुवारी मिळाले आणि गावातील तहसीलदारपदी नियुक्ती होणारी ती पहिली मुलगी ठरली.
चौकट
आई वडिलांचा मोठा त्याग- खंडेराव निकम हे कुंभी कासारीचे कर्मचारी. तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलण्याची ताकद नसताना कारखान्यात रात्रपाळीने काम करायचे व दिवसा इलेक्ट्रॉनिकची कामे करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते.मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी गावातून शहरात भाड्याच्या घरात संसार थाटला.
तिन्ही मुले यशस्वी - खंडेराव निकम यांची पहिली मुलगी रविना सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलगा रोहन जलसंधारण विभागात वर्ग-२ चा अधिकारी तर रेश्माची तहसीलदारपदी निवड झाली आहे.
प्रतिक्रिया
माझे एमपीएससी होऊन सामान्य प्रशासकीय सेवेत काम करण्याचे ध्येय होते. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या धुडकावून आठ वर्षे कष्ट घेतले. चौथ्या प्रयत्नात मला यश मिळाले. तहसीलदार म्हणून पत्र मिळाल्याने माझ्या आईवडिलांचे व बहिणभावाने प्रोत्साहन सार्थकी लागले.
रेश्मा निकम (तहसीलदार)
मी जमीन सोने,घर यात गुंतवणूक करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर खर्च करून गुंतवणूक केली.सर्वच मुले लाखाच्या पटीत पगार घेणार असल्याने माझी गुंतवणूक सार्थकी ठरली -खंडेराव निकम(वडील)
0 Comments