Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

म. गांधी वाचनालयाचा मानाचा " जीवनगौरव पुरस्कार " डॉ .संपतराव कांबळे यांना जाहीर.

 म. गांधी वाचनालयाचा मानाचा " जीवनगौरव पुरस्कार " डॉ .संपतराव कांबळे यांना जाहीर.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

मेढा  प्रतिनिधी

 शेखर जाधव

-----------------------------------------

       म. गांधी सार्वजनिक वाचनालयाचा या वर्षीचा मानाचा " जीवनगौरव पुरस्कार " मेढा नगरीचे माजी सरपंच , संस्थेचे जेष्ठ सल्लागार डॉ. संपतराव कांबळे यांना जाहिर करण्यात आला असून संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे विविध पुरस्कारही जाहिर करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव धनंजय पवार , सांस्कृतिक कार्यक्रम विभागाच्या अध्यक्षा सौ. शोभा शेडगे यांनी दिली.

     महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा ( तालुका अ वर्ग ) यांचे वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि १७ मार्च २०२४ रोजी स्व .विजया थत्ते सभागृह दुपारी २ वा. संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांचे अध्यक्षतेखाली , संध्या चौगुले ,सोमनाथ काशिळकर, सुर्यकांत देशमुख , डॉ अक्षया कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सल्लागार , संचालक यांचे उपस्थीती मध्ये विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

    यामध्ये संस्थेचा मानाचा " जीवनगौरव पुरस्कार " डॉ. संपतराव कांबळे, स्व सावित्री थत्ते आदर्श महिला वाचक पुरस्कार _सौ वंदना प्रशांत गुरव ,सौ रेखा संजय वांगडे , सौ निलम संजय पवार, यांना स्व .जनाबाई मारूती पार्टे आदर्श माता पुरस्कार सौ अनिता युवराज सुर्यवंशी, स्व .मंदाकिनी तुकाराम ओंबळे जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार सौ.जयश्री रविंद्र शेलार, स्व. मंदाकिनी तुकाराम ओंबळे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.मनिषा शंकर मानुगडे उंब्रज, डॉ. एस. आर. रंगनाथन जिल्हास्तरी आदर्श ग्रंथपाल पुरस्कार संजय रामचंद्र शिंदे नगर वाचनालय कराड, स्व .शामराव बापुराव क्षिरसागर गुरुजी जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार लक्ष्मण शिवाजी बने _ काढणे ता पाटण, इत्यादींना वरील पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत त्यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे.

    याच कार्यक्रमात विविध स्पर्धा परिक्षांमधून मेढा नगरीतील यशस्वी झालेल्या.अक्षय रमेश खताळ ( सहकार सहाय्यक अधिकारी पुणे आयुक्तालय), प्राची ज्ञानेश्वर संकपाळ ( सहाय्यक पोलीस निरीक्षक), नितीन चंद्रकांत चिंचकर ( सहाय्यक प्रबंधक आर .बी. आय .बँक ) ,रेश्मा भाऊसाहेब बेलोटे ( बी एड पदवीधर शिक्षिका) ,उमेश युवराज सुर्यवंशी ,शाहरुख बशीर खान ( वहातुक निरीक्षक) ,जावेद मुबारक शेख ( भुमि अभिलेख भु माफक अधिकारी) व सौ.. पल्लवी निखिल खताळ( समुदाय आरोग्य अधिकारी ), सौ. प्रियांका श्रीराम किरवे ( आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त )

यांचा सत्कार करण्यात येणार आहे

Post a Comment

0 Comments