Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना मिळाला न्याय.

 शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना मिळाला न्याय.

-------------------------------------------

लोहा प्रतिनिधी|
अंबादास पवार 

------------------------------------------

मागील 15 ते 20 दिवसांपासून नांदेड जिल्हा परिषद विषय शिक्षकांच्या दर्जन्नतीमध्ये प्रचंड गोंधळ आणि अनागोंदी माजली होती. विषय शिक्षकांच्या पदस्थापनेचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. विषय शिक्षक दर्जोन्नतीमध्ये अन्याय झालेल्या सर्व शिक्षकांमध्ये प्रशासनाच्या विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. कोणी लक्ष द्यायला तयार नव्हते.काही ठरावीक शिक्षक बांधवाना पदस्थापना बदलून मिळत होत्या पण सामान्य वाडीतांड्यावरील शिक्षक न्यायाच्या प्रतिक्षेत होते आश्या गंभीर प्रश्नी  म.रा.शिक्षक सेनेच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून नांदेड जि.प. प्रशासना कडून दजोंनंतीत होत असलेली अनियमितता  व शिक्षकावर झालेला अन्याय  सांगण्यात आला, यावेळी सौ. आशाताई शिंदे यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल  मॅडम यांच्यासोबत शिक्षकांच्या विषयावर सखोल चर्चा करून विषय शिक्षकांना समुपदेशनानुसारच दर्जोनंती मिळणे किती आवश्यक आहे हे  सांगितले, शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेकडो विषय शिक्षकांच्या दर्जोंनंतीचा गंभीर प्रश्न मार्गी लागला असून जिल्ह्यातील अनेक अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळाला असल्याने  शिक्षक सेनेच्या वतीने  शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

       यावेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस रवी बंडेवार ,जिल्हा उपाध्यक्ष  अविनाश चिद्रावार  ,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसीकर , लहू पंदलवाड, राजेश पवार  सह अनेक न्याय मिळालेले शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments