Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचा दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धरणे आंदोलन करून पाठींबा.

 वंचित बहुजन आघाडीचा दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धरणे आंदोलन करून पाठींबा.

---------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर.

---------------------------

 वंचित बहुजन आघाडी रिसोड तालुक्याच्या वतीने दिल्ली येथे देशातील शेतकऱ्यांनी 15व 16 मार्च या दोन पुकारलेल्या आंदोलनाला पाठींबा देत रिसोड तहसील कार्यालयासमोर 15 मार्चला एक दिवशीय धरणे आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा अध्यक्षा किरण गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांच्या नेतृत्वात एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांपैकी तालुका संघटक मनोज देशमुख,युवा तालुका महासचिव मोरे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रंगनाथ धांडे,महासचिव सोनाजी इंगळे,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती इंगळे, जिल्हाध्यक्ष किरण गिऱ्हे,रवि अंभोरे, तालुका अध्यक्ष सय्यद अकील इत्यादीनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरनाचा निषेध करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत या अपयशी सरकारला पायउतार करावे अशी मनोगत व्यक्त केली.धरणे आंदोलनानंतर दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा देणारे निवेदन जिल्हाध्यक्ष किरण गिऱ्हे यांच्या नेतृत्वात तहसीलदार रिसोड यांना देण्यात आले.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष किरण गिऱ्हे, महासचिव सोनाजी इंगळे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले, उपाध्यक्ष प्रा. रंगनाथ धांडे, उपाध्यक्ष गिरीधर शेजूळ, जेष्ठ कार्यकर्ते प्रा.रवि अंभोरे, महिला तालुका अध्यक्ष ज्योतीताई इंगळे, महिला महासचिव प्रतिभा अंभोरे,उपाध्यक्ष मंदाताई धांडे, तालुका अध्यक्ष सय्यद अकील, शहर अध्यक्ष मोहम्मद असिफ, तालुका संघटक मनोज देशमुख,तालुका उपाध्यक्ष तौसिफ़ शेख,जहूर सर, दिनेश जमधाडे, विधी सल्लागार ऍड डी टी मोरे, पत्रकार राहुल जुमडे इत्यादी सह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर शेजूळ यांनी केले तर आभार शहर महासचिव जहूर सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments