उपयोग करता कर हटवा कृती समीतीने केली विज बिलाची मनपा मुख्यालय होळी.
उपयोग करता कर हटवा कृती समीतीने केली विज बिलाची मनपा मुख्यालय होळी.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम.
------------------------------
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाकडून उपयोगकर्ता ( झीजिया कर )लावण्यात आलेले आहेत तो कर रद्द करण्यात यावा यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय सामाजिक संघटना नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपयोगकर्ता कर हटवा कृती समिती स्थापन करण्यात आली .
या मागणीसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून आज विज बिलाची होळी करण्यात आली
यावेळी माजी आमदार नितीन राजे शिंदे ,रत्नाकर नागरे, हॉटेल चालक-मालक शैलेश पवार ,शेर भाई सौदागर ,आश्रम वाकर जमादार, प्रकाश निकम ,शंभूराज काटकर, तानाजी रुईकर, मदन भाऊ युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे ,ज्योती आदाटे ,रेखा पाटील, कामरान सय्यद ,गणेश कोंडके, रेखा दांगडे, प्रियंका तुपलोंडे व भागातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment