Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सीपीआरमधील बनावट अन्न व औषध परवाना व दस्ताऐवज निविदा प्रक्रियेत.

 सीपीआरमधील बनावट अन्न व औषध परवाना व दस्ताऐवज निविदा प्रक्रियेत.

-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

------------------------

 सहभागाबद्दल गठीत चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर.

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे बनावट अन्न व औषध परवाना व दस्ताऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. समितीने दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्षात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व दस्ताऐवजांची तपासणी व पडताळणी करुन सखोल चौकशी अहवाल तयार केला असून तो अहवाल शासनास सादर केला असल्याची माहिती संचालक तथा अध्यक्ष (चौकशी समिती, वैद्यकीय शिक्षण व संशोधन) मुंबई डॉ. दिलिप म्हैसेकर यांनी दिली आहे. 


 मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. दिलिप म्हैसेकर, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, डॉ.शं.च.शा.वै.म.नांदेडचे प्राध्यापक डॉ. हेमंत गोडबोले, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, श्री भा.हि.शावैम.धुळेचे सह प्राध्यापक डॉ. सुनिल लिलानी व वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे प्रशासकीय अधिकारी समाधान जामकर यांची चौकीशी समिती नियुक्त करण्यात आली होती.


****

Post a Comment

0 Comments