Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मानसिंगराव अण्णा " विकासाचे महान विद्यापीठ.

 मानसिंगराव अण्णा " विकासाचे महान विद्यापीठ.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा  प्रतिनिधी

प्रमोद पंडीत 

-------------------------------------

ओझरे गावचे सुपुत्र ' जावली पंचायत समितीचे मा सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य ' मुंबई माया नगरीतील नळ बाजारातील व्यापारी मा . मानसिंगराव गेणू मर्ढेकर एक महान समाज सुधारक हारपले . 1972 साली संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली होती त्यातच कण्हेर धरणाचा शुभारंभ झाला. आकाशवाणी वरुण दुष्काळाच्या छायेत महाराष्ट्र राज्यातील सर्व गावांना झळा सोसाव्या लागत होत्या अनेक ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाने अनेक रस्ते व विकासात्मक कामे होवून लोक उपाशी राहू नयेत म्हणून अनेक उपाययोजना करून या दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. लोक होरपळून गेली असता नव्यानेच कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मेढा उत्तर दक्षिण विभागातील कण्हेर जलाशयातील बुडीत क्षेत्रातील अनेक गावचा प्रश्न लोकांच्या समोर आ वासून उभा होता. त्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आदरणीय मानसिंगराव मर्ढेकर अण्णांनी जावलीतील लोकांना सोबत घेवून त्यांनी कण्हेर प्रकल्प पुनर्वसित लोकांच्या लढ्याला त्याकाळी जावळीचे एक साप्ताहिक काढून आपल्या परिसरातील सर्व आया बहीण भावंडाना घेवून शासन दरबारी खूप मोठा लढा निर्माण केला. व जास्तीतजास्त लोकांचा फायदा अण्णांच्या मार्गदर्शना मुळे मिळाला. असे असले तरी आज अण्णा या 2003 नंतर सुद्धा लढत राहिले विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्याकडे पाठपुरावा करून अण्णांच्या सोबतीने 148 घरांचे बुडीत क्षेत्रात असलेल्या लोकांना लाभ मिळवून दिला त्यांनी अनेक दशके मेढा विभागाचे नेतृत्व केले

महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌹🙏🙏💐🌹

Post a Comment

0 Comments