उचगावातून चार चाकी लंपासअज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.
उचगावातून चार चाकी लंपासअज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.
----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------
गांधीनगर:- उचगाव ता करवीर येथील पूजा प्रिया पार्क अपार्टमेंटच्या पार्किंग मधून सुझुकी इको क्रमांक एम. एच. 09 फ. व्ही.4073 ही अंदाजे 3 लाख 50 हजार किमतीची चार चाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार राजेंद्र भालचंद्र सोनार वय 51रा उचगाव ता करवीर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. ही घटना ८ मार्च ते 9 मार्च च्या दरम्यान घडली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी राजेंद्र सोनार हे घाडगे पाटील इंडस्ट्रीजच्या समोर पूजा प्रिया पार्कमध्ये वास्तव्यास आहेत. बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये 8 मार्च रोजी आपली चार चाकी लावली होती. 9 मार्च सकाळी पार्किंग मध्ये गाडी मिळून आली नसल्याने त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली . नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बजरंग हेबाळकर करत आहेत.
Comments
Post a Comment