Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाघेश्वर हायस्कुल स्पर्धा परिक्षेत कु वरद पंडीत प्रथम.

 'वाघेश्वर हायस्कुल स्पर्धा परिक्षेत कु वरद पंडीत प्रथम.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

प्रमोद पंडीत

--------------------------------

    मेरू विद्या मंदिर वाघेश्वर ता जावली मध्ये गेली सहा वर्षे पहिली ते दहावी पर्यंतच्या जावली तालुक्या स्तरावर मुलांच्या बुद्धी मता चाचणीत स्पर्धा परिक्षा बाबत ग्रामिण भागातील मुलांच्या मनात भिती असते स्पर्धा परिक्षा म्हणजे जीवनात केरिअर करण्याचा मार्ग तो व्यवस्थित चोखळता आला पाहिजे या स्वच्छ हेतूने केंजळ गावचे सुपुत्र व मेरू विद्या मंदिर वाघेश्वर हायस्कुलचे माजी विद्यार्थी मा श्री नवनाथ यदू केंजळे त्यांचे वडिल कै, यदू महादेव केंजळे (माजीसरपंच )स्मरणार्थ सन २०२३ ते २०२४ या वर्षी पहिली ते दुसरी तीसरी ते चौथी , पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या विविध गटात स्पर्धा परिक्षा घेण्यात आले होते त्याचे औचित साधून स्पर्धा परिक्षा बक्षिस वितरण सोहळा घेण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोज भोसले गट विकास अधिकारी जावली व प्रमुख पाहुणे नायब तहसिलदार सुनिल मुनाळे साहेब आणि मेढा पोलिस स्टेशचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर उपस्थित होते या सर्व मान्यवराच्या हस्ते इयत्ता तिसरी ते चौथी या गटात जिल्हा परिषद केंद्र शाळा भणंग या शाळेचा विद्यार्थी कु वरद दुर्गादास पंडीत याने प्रथम क्रमांक पटकविला . केंद्र शाळा भणंग शाळेचे मुख्याध्यापक श्री के .डी धनावडे गुरुजी , अशोक लकडे गुरुजी , श्री ओबळे गुरुजी , वर्ग शिक्षक विश्वास भिसे गुरुजी आणि सौ साळुंखे मॅडम या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच गणेश जगताप . माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्रनाथ क्षीरसागर हनुमान उदय मंडळाचे अध्यक्ष जोतिराम जाधव , उपध्यक्ष - आकाश जाधव खजिनदार मिलिंद जाधव , सचिव - प्रमोद पंडीत सदस्य प्रशांत जाधव , आकाश जगताप ,कृष्णा जाधव ,रोहन जाधव , लक्ष्मण जाधव यांनी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments