कंकरवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी निघाले इस्रोच्या अभ्यास दौऱ्यावर.
कंकरवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी निघाले इस्रोच्या अभ्यास दौऱ्यावर.
--------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------------
शाळेची गुणवत्ता, दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत व नवोदय प्रवेश परीक्षेत पात्र होणारे विद्यार्थी,जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी प्रणव कोल्हे याचा आलेला प्रथम क्रमांक, अल्पावधीत शाळेतील शिक्षकांनी शाळेची केलेली प्रगती या सर्व बाजू विचारात घेऊन शाळेतील तीन विद्यार्थी व एका शिक्षकाची माननीय शिक्षण अधिकारी वाशिम यांनी इस्रो (बेंगलोर) दौऱ्यासाठी निवड करण्यात आली दिनांक 15 मार्च 20 मार्च यादरम्यान हा अभ्यास दौरा संपन्न होणार आहे
इस्रोच्या अभ्यास दौऱ्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी कोल्हे, वैशाली माहोरे व प्रणव कोल्हे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांसमवेत शाळेचे शिक्षक श्री श्रीनिवास कडेकर सर हे सुद्धा जाणार आहेत
या अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी शाळेतील मु अ तथा केंद्रप्रमुख श्री मेघश्याम पत्रे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील शिक्षक नंदकिशोर गाताडे, केशव बोरकर, शंकर खानझोडे, सुरेश रंजवे, साहेबराव जाधव, अरुण मुकाडे,ओंकार बेतले, दत्तात्रय बोडखे यांचे विशेष परिश्रम लाभले.
Comments
Post a Comment