Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा पत्रकार सेवा संघ अध्यक्षपदी शिवराज पवार यांची चौथ्यांदा फेरनिवड

 लोहा पत्रकार सेवा संघ अध्यक्षपदी शिवराज पवार यांची चौथ्यांदा फेरनिवड.

----------------------------------------------------

लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार 

----------------------------------------------------

लोहा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार शिवराज पाटील पवार यांनी संघटनेच्या मागील कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ठ कामाची दखल घेत त्यांच्यावर पुन्हश्च चौथ्यांदा संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांनी दिली. मागील तीन दशकांपासून शिवराज पवार हे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपल्या निस्वार्थी, प्रामाणिक आणि बेधडक पत्रकारितेतून सर्वसामान्य वंचित घटकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच पवार यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य सुरूच आहे. पत्रकार शिवराज पवार यांना सलग चौट्यांदा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार आणि राज्य सल्लागार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, विभागीय संघटक बा. पु. गायखर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी केली.

Post a Comment

0 Comments