Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीच्या जिल्हा समन्वयक पदी बाळासाहेब देशमुख यांचे नियुक्ती.

 महाविकास आघाडीच्या जिल्हा समन्वयक पदी बाळासाहेब देशमुख यांचे नियुक्ती.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत ठाकूर.

----------------------------------------

सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही काळातच निवडणुकीच्या तारखाही जाहीर होतील. राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांमध्ये जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने संयुक्तपणे सामोरे जात आहे. त्याच अनुषंगाने एकत्रित काम करण्याचे निर्देश राज्यस्तरीय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्याकडून देण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा महाविकास आघाडीमध्ये समन्वय राखण्यासाठी समन्वय पदाची जबाबदारी सर्वांमध्ये बाळासाहेब देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही वाशिम जिल्हा महाविकास आघाडी समन्वय या पदावर असून सुधाकर काशीराव देशमुख यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.


सदर महाविकास आघाडी वाशिम जिल्ह्याचे नियुक्तीपत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित झनक,उ.भा.ठा गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार गटाचे बाबाराव पाटील खडसे यांनी ही नियुक्ती केली असून त्याच्याप्रती महाविकास आघाडी मधील काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाठा गटातील प्रदेशाध्यक्ष यांना पाठवण्यात आले आहे.


बाॅक्स 

वाशिम जिल्हा महाविकास आघाडी यांनी अत्यंत महत्त्वाचे जबाबदारी माझ्याकडे दिली असून महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधून जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीमध्ये कसे निवडून येतील त्या साठी एकजुटीने आम्ही सर्व मिळून एकत्रित काम करून

बाळासाहेब देशमुख

समन्वयक महाविकास आघाडी वाशिम जिल्हा.

Post a Comment

0 Comments