Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

देशात सध्या भाजपा ब्लॅकमेलिंगच राजकारण करतंय ऍड प्रकाशजी आंबेडकर नवी मुंबईतील रेकॉर्डब्रेक सभा.

 देशात सध्या भाजपा ब्लॅकमेलिंगच राजकारण करतंय ऍड प्रकाशजी आंबेडकर नवी मुंबईतील रेकॉर्डब्रेक सभा.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

नवी मुंबई प्रतिनिधी 

रवि पी. ढवळे 

-------------------------------

नेरुळ :- गेल्या दहा वर्षांपासून भाजप सत्तेत बसला आहे आणि येथे असणारा व्यापारी वर्ग आणि विरोधी पक्षातील लोकांना इडी (ED )ची भीती दाखवून ब्लॅकमेलिंगच राजकारण भाजप आणि आरएसएस करत असल्याचा आरोप ऍड. प्रकाशजी आंबेडकर यांनी केला. ते नेरुळ येथील सत्ता परिवर्तन महासभेमध्ये बोलत होते.

नेरुळ येथील रामलीला मैदानावर ही घेण्यात आली होती. सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ऍड. प्रकाशजी आंबेडकर यांना समता सैनिक दल नवी मुंबई यांच्या सलामी देण्यात आली.

यावेळी मंच्यावर उपस्थिती मध्ये वंचित प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा उपाध्यक्ष सार्वजीत बामसोडे , उपाध्यक्ष अनिल जाधव,प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, प्रियदर्शीनं तेलंग, मुंबई अध्यक्ष अबुल हसन नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिलीप बंदिचोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या वेळी अनेक पक्षातील लोकांनी

वंचित बहुजन आघाडी जाहीर पक्षप्रवेश केला. यात आदिवासी, मुस्लिम, मातंग, बंजारा समाजातील लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये ऍड प्रकाशजी आंबेडकर यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला.


पुढे बोलताना श्री आंबेडकरजी म्हणाले कि,सध्या देशात आणि महाराष्ट्र मध्ये विरोधी पक्ष उरलेला नाही आहे आणि जों कुणी भाजप यांच्या विरोधात बोलतील त्यांना इडी (ED )भीती दाखवल्या जाते. भाजप विरोधात बोलण्याची ताकत फक्त वंचित बहुजन आघाडी यांच्या मधीच आहे.आपला भारत देशाचा पंतप्रधान नसून तो गुजरातचा पंतप्रधान आहे असे समजून ते प्रत्येक प्रकल्प हा तिकडे घेऊन जात असल्याचा आरोप ही श्री.आंबेडकरजी यांनी केला.

रक्ताचे पाणी करू, पण आम्ही बाळासाहेब यांच्या पाठीशी उभे राहू.. सर्वजीत बामसोडे.

बाळासाहेब तुम्ही जितक्या जिद्दीने महाराष्ट्रच्या कानकोपऱ्यात वंचीत, भटके, आदिवासी आणि सर्व समाजाला आपल्या आंदोलनासोबत जोडण्याच्या प्रयत्न करत आहात. आमच्या नवी मुंबई मधील माणसं सुद्धा मागे हटणार नाहीत. आम्ही सुद्धा रक्ताचे पाणी करू पण बाळासाहेब आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार असे सर्वजीत बामसोडे आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले.


*वंचितांचे राजकारण करणारे ओळखा.. सिद्धार्थ मोकळे*


प्रत्येक दिवशी हजारो माध्यमात घातलेले, मीडिया मधून वेगवेगळे वावडे उठवणारे आणि वंचितांचे राजकारण बदनाम करणारे या सगळ्यांना आपल्याला ओळखावं लागेल.

ज्या हेतूने बाळासाहेब आंबेडकरांनी हा लढा उभारला आहे, तो हेतू इथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवावा लागणार असल्याचे सिद्धार्थ मोकळे बोलत होते.


या सत्ता परिवर्तन महासभेला नेरुळ येथील रामलीला मैदान येथे जिल्हा पदाधिकारी, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकांची मैदान भरून गच्च गर्दी होती.ही नवी मुंबईतील रेकॉर्डब्रेक सभा झाली.

Post a Comment

0 Comments