मेढा हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच अवैद्य दारु विक्री करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार.
मेढा हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच अवैद्य दारु विक्री करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधी
---------------------------------
सातारा जिल्हयामध्ये मेढा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) प्रेम ऊर्फ बचलु विलास पाटें, वय २४ वर्षे, २) गणेश विष्णु शिंदे, वय २३ वर्षे, ३) सनि विकास कासुडे, वय २२ वर्षे, ४) राहुल रामा कुन्हाडे, यय २५ वर्षे, सर्व रा. मेढा, ता जावली जि.सातारा, यांचेवर गर्दीमारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत पोचवणे, अवैद्य दारुची चोरटी विक्री करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी संतोष तासगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक, मेढा पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षे तडीपार करणेचाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी बी. वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेचर गुन्हे करण्याच्या प्रवृतीत कोणताही बदल इझाला नाही. ते मेढा परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे मेढा तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रय होत होता, अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षांकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोउनि तानाजी माने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिवे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, मेढा पोलीस ठाणेचे पो.ना. महेश शिंदे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
Comments
Post a Comment