गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री जोमात.
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री जोमात.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
---------------------------------
गांधीनगर :- गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसगडे न्यू वाडदे सरनोबतवाडी उंचगाव गडमुडशींगी चिचंवाड वळीवडे हि गावे येतात या गावांमध्ये जवळपास 300 ते 400 पानपट्टी मधून गुटखा खुलेआम विकला जात आहे
महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी लागू केली असली तरी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि गुटखाबंदी लागू झाली नाही असे चित्र स्पष्ट दिसत आहे
कारण या पानपट्टी मधून अर्थ पुर्ण वाटाघाटी झाल्यामुळे गुटखा विक्रीस अलिखित परवानगी दिली असल्यामुळे गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधून खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे
या पानपट्टी मधून खुद्द गुटखा विक्रेता दरमहा वसुली करुण अलिखित आदेश देणाऱ्या अधिकारी यांना पोच केले अशी चर्चा नागरीकांच्या मधून बोलली जात आहे.
अन्न औषध प्रशासन व गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आशीर्वादाने गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री सुरू आहे
Comments
Post a Comment