केजरीवालांच्या अटकेविरोधात कोल्हापूर आप आक्रमक.
भाजप कार्यालयावर मोर्चा- पोलिसांशी झटापट.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
करवीर प्रतिनिधी
रोहन कांबळे
--------------------------------
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. अटकेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. आम आदमी पार्टीने नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढून या कारवाईचा निषेध केला. आप'चे कार्यकर्ते महावीर कॉलेज जवळ आले असता त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी आप कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची तारांबळ उडाली होती.
कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली आप नेते मनीष सिसोदिया व खा. संजय सिंह यांना या आधी अटक झाली होती. गेल्या दीड वर्षामध्ये अनेक छापे टाकून देखील कोणतीही 'मनी ट्रेल' न सापडल्याने ईडी कोर्टाने ईडीला झापले होते.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसिंहिता लागू असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करणे म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याचे आप प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
ईडीने कारवाई केलेल्या चौदा कंपन्यानी इलेकटोरल बॉण्ड्स (निवडणूक रोख्यांच्या) माध्यमातून भाजपला शेकडो कोटींच्या देणगी दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई थाबवण्यात आल्याचा आरोप अतुल दिघे यांनी केला.
यावेळी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी मोर्चात सहभाग नोंदवला.
काँग्रेसचे ऋषिकेश पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, आप जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, किरण साळोखे, कुमाजी पाटील, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मोईन मोकाशी, रवींद्र राऊत, समीर लतीफ, आदम शेख, फिरोज शेख, आनंदा चौगुले, स्मिता चौगुले, मयुर भोसले, दिग्विजय चिले, नाझिल शेख, संजय नलवडे, राकेश गायकवाड अमरसिंह दळवी, प्रथमेश सूर्यवंशी, रणजित पाटील, अर्जुन कांबळे, निलेश रेडेकर, सुधाकर शिंदे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments