Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यात प्रिंट मीडियाचे महत्त्व अजूनही कायम टिकून -माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन -करवीर भूषण पुरस्कार प्रदान.

 इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यात प्रिंट मीडियाचे महत्त्व अजूनही कायम टिकून -माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन -करवीर भूषण पुरस्कार प्रदान.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी

विजय कांबळे 

------------------------------------

- सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यात प्रिंट मीडियाचे महत्त्व अजूनही टिकून असून पत्रकारांनी वास्तव चित्र समाजासमोर मांडावे आणि समाज प्रबोधनाचे काम करावे असे प्रतिपादन कुंभी कासारी कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.                       कळंबा (ता.करवीर) येथील अमृतसिद्धी सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलेल्या करवीर पत्रकार संघाच्या करवीर भूषण पुरस्कार वितरण समारंभात माजी आमदार नरके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ दूध संघाचे संचालक विश्वास पाटील व अजित नरके उपस्थित होते.

      माजी आमदार नरके यांनी पुरस्काराने पाठीवर कौतुकाची थाप मिळते असे सांगून पत्रकारांनी विधानपरिषदेसारखे ध्येय हे ठेवून पुढे वाटचाल करावी आणि व्यावसायिकतेच्या स्पर्धेत टिकून राहावे असे आवाहन केले.

     गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके यांनी करवीर पत्रकार संघाच्या सदस्यांची मेडिक्लेम विमा पॉलिसी करण्याचे आश्वासन देऊन पत्रकारांनी विधायक कामांना प्रसिद्धी द्यावी असे आवाहन केले.

   प्रमुख पाहुणे गोकुळचे संचालक विश्वास पाटील यांनी पत्रकारांनी वस्तुस्थिती पाहून बातम्या देण्याचे काम करावे असे सांगून पत्रकार संघाचा रौप्यमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करावा,त्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.

     स्वागत अध्यक्ष प्रकाश नलवडे यांनी केले. प्रास्ताविकात प्रा.एस.पी.चौगले यांनी पत्रकार संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील -शिंगणापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कुंभी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तरुण भारतचे वाकरे प्रतिनिधी प्रा.एस.पी. चौगले,करवीर भूषण पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल तरुण भारतचे पाचगाव वार्ताहर दयानंद जाधव,चुये प्रतिनिधी जालिंदर पाटील यांची गटसचिव संघटनेवर निवड झाल्याबद्दल,यशवंत बँक संचालकपदी बाबुराव रानगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. के.एस.पाटील, एकनाथ जगदाळे, संजय दाभाडे,संजय व्हनाळकर यांना करवीर भूषण पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन कुंडलिक पाटील व उत्तम पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष जालंदर पाटील यांनी मानले. संयोजन मच्छिंद्र मगदूम, बाजीराव तळेकर, प्रकाश पाटील, निलेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला यशवंत बँकेचे अध्यक्ष महेश पाटील,संजय गांधी निराधार योजना करवीर तालुका माजी अध्यक्ष राजेंद्र दिवसे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments