Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महसूल विभागाची दिशाभूल करून शासनाची केली फसवणूक–विजयराव बावणे. प

 महसूल विभागाची दिशाभूल करून शासनाची केली फसवणूक–विजयराव बावणे.

सखोल चौकशी करून कारवाईची मागणी.

मौजा कोरपना तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथील मूळ सर्व्हे नंबर १३ व चालू सर्व्हे नंबर १३/२ या जमिनीचे समोरील मुस्लीम समाजाचे श्रध्दास्थान महसूल विभागाची गायरान परणपोक जमीन टेकडी अंदाजे १ हेक्टर असलेल्या जमिनीवरील किशोर बावणे यांनी अवैध रित्या मुरूम खोदून शासनाची दिशाभूल करून, शासनाची अंदाजे २५ लाखांची फसवणूक केली असे 

आरोप विजयराव बावणे यांनी केले आहे.

सविस्तर माहिती या प्रमाणे आहे की, मौजा कोरपना येथे निजामकालीन वेळेपासून मुस्लीम समाज कोरपना येथे राहत असून त्यांची संख्या लोकसंख्येच्या आधारे तेव्हाची ५० टक्के होती. आज ४० टक्के आहे गावातील समस्त मुस्लीम बांधव रमजान ईद व बकरी ईद या सणाला सर्व्हे नंबर १३/२ समोर असलेल्या टेकडीवर ईदगाह म्हणून ईद ची नमाज पठन करीत होते. या टेकडीवर निजामकालीन वेळेपासून अंदाजे सन २००१ - ०२ पर्यंत मुस्लीम बांधव या ठिकाणी ईद ची नमाज पठन करीत होते हे मात्र विशेष.

ही जागा महसूल विभागाची आहे.

    त्यानंतर मुस्लीम समाजाचे सय्यद आबिद अली यांनी स्वताचे शेतातील जमीन ईदगाह करिता देऊन त्या ठिकाणी ईदगाहचे बांधकाम केले तेव्हापासून कोरपना येथील मुस्लीम बांधव ईद ची नमाज पठन करिता सय्यद आबिद अली यांनी दिलेल्या नवीन ठिकाणी ईद ची नमाज पठन करतात याबाबत कोरपना शहरातील मूळ रहिवासी असलेले मुस्लीम बांधव ज्यांचे वय अंदाजे ३० च्या समोर ७० - ७५ पर्यंत असेल अश्या सर्व शहरातील मुस्लीम बांधव त्या ठिकाणी नमाज पठन करीत आहे.


याबाबतचे माहिती अशी की, मौजा कोरपना सर्व्हे नंबर १३ आराजी ३ हेक्टर ७७ आर त्याची चतुरसीमा पूर्वेला - विठ्ठल पंदिलवार व भिवापुरे यांचे शेत, पश्चिम - भाउराव कावडकर यांचे शेत व वस्तीगृह, दक्षिण – शासकीय नाला, उत्तरेला - शासकीय जमीन व टेकडी अंदाजे १ हेक्टर या प्रमाणे चतुरसिमा असून सदर शेताची संपूर्ण आराजी मौक्यावर असतांना किशोर बावणे यांनी संभाशिव गोविंदा झाडे यांचेकडून ०.८१ आर जमीन संकेत किशोर बावणे यांचे नावाने शेताचे उत्तरेकडे घेऊन त्याच्यासमोर असलेली महसूल विभागाची शासनाची टेकडी सपाटीकरण करण्याच्या नावावर तहसीलदार कोरपना यांची दिशाभूल करून संकेत किशोर बावणे यांनी संपूर्ण टेकडी खोदून सर्व्हे नंबर मौजा कोरपना ३०/४अ / १ आराजी ०.३५ या शेतात अंदाजे १५०० ब्रास मुरूम टाकून घेतलेला आहे. या शेताची कोणत्याही प्रकारची एन. ए. टीपी नाही तसेच त्याठिकाणी संकेत किशोर बावणे याला पेट्रोल पंप मंजूर झाल्यामुळे शासनाचा अवैध मुरूम खोदून तेथे गैरकायदेशीर रित्या साठा केलेला आहे.


संकेत किशोर बावणे यांनी तहसीलदार कोरपना यांचेकडे सपाटीकरणाचा अर्ज दिनांक २६/ ०२/ २०२४ ला दिला त्याच दिवशी तहसीलदार साहेब यांनी किंवा त्यांच्या वतीने मौक्यावर चौकशी न करता पटवारी व आर. आय. यांना चेंबर मध्ये बोलावून दोघांचाही मौका चौकशी रिपोर्ट बनवून घेतला व त्याच दिवशी संकेत किशोर बावणे यांना परवानगी पत्र क्रमांक /कावि/ म. सहा. / गौ. ख / २०२४/१५८ दिनांक २६/०२/२०२४ ला प्रदान केली. व सर्व कार्यवाही तहसील कार्यालयात बसून केली. असे आरोप करीत ही परवानगी कोणत्या मार्गाने कोणाच्या आशीर्वादाने मिळाली याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण की परवानगी देताना कोणत्याही प्रकारचा जाहीरनामा काढण्यात आलेला नाही. मौक्यावर जाऊन जागेची पाहणी केली नाही. शेताचे सीमांकन ही बघितले नाही व उत्खनन जेथे करायचे आहे त्या जागेचे डीमार्केशन ही संबंधित विभागांनी करून दिले नाही. आणि अश्या या मिळालेल्या परवानगीच्या आधारावर मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान(जेथे ईद ची नमाज पठन केली जात होती अशी ती जागा) असलेल्या शासनाची महसूल विभागाची टेकडी खोदून सपाटीकरण करण्यात आले.असे आरोप विजयराव बावणे यांनी केले असून याबाबत किशोर राजेश्वर बावणे व संकेत किशोर बावणे यानी उत्खननासाठी कागदोपत्री दाखविलेल्या जागेची प्रत्यक्षरीत्या मौका चौकशी करावी व ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर शासनाचा दंड आकारून त्यांचे विरोधात पो. स्टे. कोरपना येथे एफ. आय.आर. करण्यात यावा अशी मागणी गावातील हिंदू मुस्लीम समाजाची असल्याचे एका पत्रकान्वये विजयराव बावणे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments