Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी पुनम देसाई यांची निवड.

 ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी पुनम देसाई यांची निवड.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------------

  कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी राधानगरी येथील उद्योजिका पूनम देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

 जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांच्या आदेशाने नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करण्यात आली असून यामध्ये ग्राहक संघटना,वैद्यकीय,व्यापार,शेतकरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे समितीचे सचिव असणार आहेत . 

या परिषदेमध्ये ग्राहक संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून पूनम देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे ..त्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या कोल्हापूर जिल्हा महिला संघटिका म्हणून कार्यरत आहेत . महिला सक्षमीकरण, तनिष्का,दक्षता समिती,मानींनी अश्या अनेक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे ...

Post a Comment

0 Comments