Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात'प्रहारचा' उमेदवार.

 अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपला टेन्शन; नवनीत राणा विरोधात'प्रहारचा' उमेदवार.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज  महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

पी.एन.. देशमुख.

 -------------------------------------

अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता'बच्चू कडू'यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार नाही या अमरावती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवीले आहे. प्रहार चे मेळघाट मधील आमदार राजकुमार पाटील म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावती येथील प्रहार संघटनेने उमेदवार उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावती मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश भाऊ यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहार चे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो असे त्यांनी सांगितले. तसेच दिनेश भाऊ हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बुक यांना प्रहार चे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत. भाऊ यांच्याबाबत मतदारसंघात सकारात्मक वातावरण दिसून आले आहे. अमरावती मतदारसंघात प्रहार संघटनेचेदोन आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय केले होते? आमच्या मतानुसार आमचा लोकप्रिय प्रहार संघटनेचा पक्ष वाढवा असे सगळ्यांना वाटते असं आमदार राजकुमार पाटील यांनी म्हटले. दरम्यान, माझ्यासमोर दोन उमेदवार आहेत ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहे. सरकारी पैशातून श्रेय वादाचे बॅनर लावणे शिकविले मी शेकडो कोटी रुपयांचे काम केले, पण इतरा सारखे कुठेही मी माझ्या नावाचा बोर्ड लावला नाही. विकास कामे होत राहतील पण समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. ही दरी दूर करण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधी गरज आहे असे दिनेश भाऊ बुब यांनी सांगितले. प्रहार ही संघटना शिवसेनेतूनच निर्माण झालीय. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा पक्ष नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा सोपस्कार करण्याची आवश्यकता वाटत नाही. शिवसेना रक्तातून काढू शकत नाही. हा भावनिक विषय, भगवा झेंडा हाती घेऊनच निवडणुकीला समोर जाणार आहे. जर उद्धवजी ठाकरेंनी राजीनामा मागितला तर देऊ. प्रहार कडून ही निवडणूक लढवावी अशी सर्व मतदारांची इच्छा आहे.

Post a Comment

0 Comments