Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर पुणे महामार्गवर वाठार येथे भरधाव ट्रकची मजुरांच्या टेपोला जोरदार धडक चार जण जागीच मृत्यू.

 कोल्हापूर पुणे महामार्गवर वाठार येथे भरधाव ट्रकची मजुरांच्या टेपोला  जोरदार धडक चार जण जागीच मृत्यू.

----------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------

वाठार - 

वाठार  ता. हातकणंगले येथे महामार्ग सर्व्हिस रस्ता जवळ काँक्रिट मिक्सर मशीन लावत असताना मजुरांना ट्रकने उडविल्याने चार जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुलाजवळ घडला.

     भादोले येथील रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मजुरांची टोळी शिये येथून आपले काम आटोपून टेम्पो( MH 09 CA -9090) मधुन भादोलेकडे निघाले होते.टेम्पोला पाठीमागे मिक्सर मशीन जोडले होते.महामार्गालगत वाठार येथे सेवा रस्त्यावर ते आले.त्या ठिकाणी सकाळी अजून एक काँक्रीटचे काम असल्याने पाठीमागील मिक्सर मशीन सोडवून ते लावण्यासाठी सर्वजण खाली उतरले. हे मशीन सोडवून लावत असतानाच  कोल्हापूरकडून भरधाव वेगाने (mh 12 LT 7095) आलेल्या ट्रकने या सर्व मजुरांना क्षणार्धात उडविले.यात सचिन धनवडे (रा.भादोले) हा जागीच ठार झाला.तर अकरा गंभीर जखमी झाले.यात दोन महिलांचा समावेश आहे.या सर्व जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात व वडगांव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या ठिकाणी अन्य तिघे मृत झाल्याचे समजते. घटनास्थळी मृत्यंजय दुत व लोकांच्या मदतीने अँब्युलन्स द्वारे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी वडगांव पोलीस ठाणे अधिकारी कर्मचारी हायवे पोलीस अधिकारी, कर्मचारी तत्काळ धाव घेतली तपास व मदत कार्य व अधिक तपास चालू केला.

Post a Comment

0 Comments