Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सैन्य दलात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारा भामटा गजाआड.

 सैन्य दलात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारा भामटा गजाआड.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

------------------------------------

सैन्य दलात नोकरी लावतो म्हणून 38 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार हळदी येथील रणजीत विष्णू पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. फसवणूक करणारा भामटा बाजीराव शामराव मोहिते( वय वर्षं 46) हा गुन्हा केल्यापासून फरारी होता. त्यास गुरवारी स्कूल कंपाऊंड नागाळा पार्क येथे शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिकंदर यांनी सीताफिने अटक केली. सदर आरोपी सात वर्षे फरारी होता.सदर आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता दिनांक 02/04/2024 पर्यंत मा. न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे. या भामट्याने आणखी किती जणांना फसवले आहे, हे आता लवकरच उघड होईल. तसेच त्यास पडद्यामागून कोणी मदत करत होते का,हा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाला असून याचा तपासही पोलिसांना करावा लागणार आहे. अलीकडे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत.

Post a Comment

0 Comments