Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सिता ज्वेलर्स चोरी करणारा चोरटा मुद्देमालसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात.

 सिता ज्वेलर्स चोरी करणारा चोरटा मुद्देमालसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

---------------------------------

श्री. अनिल केशव रेवणकर, व. व. 43, रा. 12/331, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांचे इचलकरंजी येथील सिता ज्वेलर्स नावाचे दुकानातून दि. 13.02.2024 अज्ञात चोरट्याने सोने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकान मालकसह कर्मचाऱ्यांची नजर चुकवून दुकानातून 17 ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या आकाराचे व डिझाईनचे सोन्याचे बदाम चोरुन नेले होते त्या बाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सदर चोरीचा तपास करण्याच्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे शोध पथकास दिले होते या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार महेश खोत, संजय इंगवले व अमर शिरढोणे यांचे तपास पथक तयार करुन तपास चालू केला. तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत अशी माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे, गु.र.नं. 136/2024, भा.द.वि.स. क. 380 प्रमाणे दाखल गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी बीजान शहाजहान ईराणी, रा. राजीव गांधी नगर, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर याने केला असून तो आज दि. 23.03.2024 रोजी सदर गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करणे करीता शहा पेट्रोलपंप, जयसिंगपूर येथे येणार आहे. अशा मिळाले माहितीप्रमाणे नमुद तपास पथकाने सदर ठिकाणी जावून सापळा लावून संशयीत आरोपी नामे नबीजान शहाजहान ईराणी, व. व. 50, रा.राजीव गांधी नगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यास पकडून त्याचे कब्जातून चोरीस गेलेले 1,10500/- रूपये किंमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपीसह ताब्यात घेतलेला मुद्देमाल पुढील कारवाई करीता शिवाजीनगर पोलीस ठाण्यास वर्ग केले असुन पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करवी सुरू आहे


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अपर पोलीस अधीक्षक . निकेश खोटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे, संतोष पाटील व यशवंत कुंभार यांनी केली

Post a Comment

0 Comments