गांधीनगरात चेटीचंड उत्सवाचे आयोजन 10 एप्रिल रोजी गांधीनगर बंद.
-------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------------
गांधीनगर:- गांधीनगर येथे सिंधी समाजाचे आराध्य दैवत श्री झुलेलाल भगवान जन्मोत्सव (चेटीचंड) बुधवार दि.10 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करणार असल्याची माहिती होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक टेहलानी यांनी पत्रकार बैठकीत दिली. तसेच या दिवशी गांधीनगर व्यापार पेठेतील दुकाने बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सिंधी सेंट्रल पंचायत चे अध्यक्ष गोवालदास कट्यार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या अवचित साधून सिंधी समाजाची इष्ट देवता झुलेलाल भगवान जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. बुधवारी सकाळी नऊ वाजता भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन भारतीय सिंधू सभेने केले आहे. तसेच साडे अकरा वाजता भगवान श्री झुलेलाल यांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात येणार आहे. साडेबारा वाजता होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले आहे. दुपारी एक ते तीन या वेळेत महाप्रसाद आणि सायंकाळी पाच वाजता भव्य श्री झुलेलाल भगवान यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याचे सर्व कार्यक्रमांचे नियोजन सिंधी सेंट्रल पंचायत, होलसेल व रिटेल असोसिएशन, किराणा व्यापारी असोसिएशन यांनी केले आहे. या कार्यक्रमास सर्व सिंधी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेंट्रल पंचायत तर्फे करण्यात आले. या बैठकीस उपाध्यक्ष सेवाराम तलरेजा, कार्याध्यक्ष बक्षाराम दर्डा, दिलीप कुकरेजा, मनोज वंजानी, जॉईन सेक्रेटरी अमित कट्यार, मदनलाल मलानी, सल्लागार रिकी सचदेव, बाजूमल अहुजा, सुनील कारडा ,इंदरलाल कट्यार, अनिल नरसिंघानी, मुरली अडवाणी, भरत रोहिदा, आदी व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:- बुधवार 10 एप्रिल रोजी चेटीचंड उत्सवानिमित्त गांधीनगर संपूर्ण व्यापारी पेठ पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सिंधी सेंट्रल पंचायत तर्फे करण्यात आले आहे.
0 Comments