Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोंबीग ओपॅरेशन दरम्यान 2 देशी बनावट पिस्टल, 3जिवंत काडतूस 1 रिकामे मॅगझीन, मोटार सायकल असा एक लाख पंच्यांनव हजार रुपयांचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी केला जप्त.

 कोंबीग ओपॅरेशन दरम्यान 2 देशी बनावट पिस्टल, 3जिवंत काडतूस 1 रिकामे मॅगझीन, मोटार सायकल असा एक लाख पंच्यांनव हजार रुपयांचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी केला जप्त.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर

----------------------

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोंबीग ओपॅरेशन राबवुन अभिलेखावरील गुन्हेगारांची तसेच अन्य संशयितांची झडती घेण्याच्या सूचना तसेच प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना ह्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर ( स्थानिक गुन्हे शाखा) यांस दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक अरुण फार्णे यांस पथक तयार करून सज्ज राहण्यास सांगितले. सातारा शहरातील गेंडामाळ आकाशवाणी ह्या ठिकाणी कोंबीग ऑपरेशन करीत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारमार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरातील शाहूपुरी ते आदर्श कॉलनी रस्त्यावर दोन इसम त्यांच्या काळ्या रंगाची मोपेड गाडी क्रमांक MH10. EF.7604 वरून गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकारिता येणार आहेत. त्या प्रमाणे त्यांनी प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व त्यांच्या पथकास माहिती देऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई च्या सूचना दिल्या. आरोपीची नावे (1) ओंकार राजाराम काकडे वय 21 वर्षे राहणार शिरटे ता. वाळवा, जिल्हा सांगली (2) गोरख सीताराम महाडिक वय 40 रा. घोटेघर.पो. रांजणी ता. जावली जिल्हा सातारा. असे असून सदर आरोपीवर शाहूपुरी पोलीसठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 205/2024 भारतीय शस्त्रअधिनियम (सुधारित2019) चे कलम 3,7,25,सह म पो क 37 (1)(2) 135 नुसार गुन्हा नोंद केला आहे. माहे न्होव्हेंबर 2022 पासून 82 देशी बनावट पिस्टल, 3 बारा बोर रायफल 194 जिवंत काडतूस, 377 रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे.

Post a Comment

0 Comments