लोकसभा निवडणूक 2024 मंगळवारी कोल्हापूरसाठी 2 उमेदवारांनी 5 तर हातकणंगलेसाठी 5 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे केली दाखल.
लोकसभा निवडणूक 2024 मंगळवारी कोल्हापूरसाठी 2 उमेदवारांनी 5 तर हातकणंगलेसाठी 5 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे केली दाखल.
कोल्हापूर दि.16 (जिमाका): मंगळवारी दि. 16 एप्रिल रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 2 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू शहाजी छत्रपती (पक्ष -इंडियन नॅशनल काँग्रेस) 3 अर्ज व अपक्ष मधून 1 अर्ज अशी 4 नामनिर्देशनपत्रे तर संदिप नामदेव शिंदे (पक्ष - बहुजन समाज पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल केले.
48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सत्यजित बाबासो पाटील (पक्ष - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोन अर्ज, रवींद्र तुकाराम कांबळे (पक्ष - बहुजन समाज पार्टी) एक अर्ज, शिवाजी विठ्ठल माने (अपक्ष) एक अर्ज, मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष) एक अर्ज व रघुनाथ रामचंद्र पाटील (अपक्ष) एक अर्ज अशा पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्रे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली आहेत.
नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 5 इच्छुक उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्रे तर 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्रे घेतली.
Comments
Post a Comment