पुन्हा गैरहजर राहिल्यास गुन्हे नोंदवणार - स्वाती दाभाडे
पुन्हा गैरहजर राहिल्यास गुन्हे नोंदवणार - स्वाती दाभाडे.
------------------------------------
नायगाव तालुका प्रतिनिधी
------------------------------------
लोकसभा निवडणुकीत 89 नायगाव मतदार संघातील कर्मचाऱ्यांना नायगाव येथील कुसुम लान्स येथे २९ मार्च रोजी पाहिले प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी नायगाव मतदार संघातील एकूण १३७ कर्मचारी गैरहजर होते. त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा ६ एप्रिल रोजी येथील तहसील कार्यालया शेजारी सामाजिक न्याय भवन येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास १३७ कर्मचारी या सर्वांनी हजर राहणे बंधनकारक असून गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी दिली.या नंतर सर्व कर्मचाऱ्या सोबत या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. यावेळी नायगाव तहसीलचे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड ,नायब तहसीलदार सतिश कुलकर्णी, अव्वल कारकून रोशन सिंग ग्रंथी, महसूल सहाय्यक अशोक भालेराव.निवडणुक आॅफरेटर साईनाथ भंडारे , शिपाई दिगाबंर गिरी.आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment