Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लाल मिरचीच्या तिखट दराने डोळ्यात पाणी.

लाल मिरचीच्या तिखट दराने डोळ्यात पाणी.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भुदरगड प्रतिनिधी 

स्वरूपा खतकर

------------------------------------

भुदरगड तालुक्यासह पश्चिम भागातील कडगाव येथे तिखट मिरचीला मोठी मागणी असून लग्नसराई व पावसाळ्यात वर्षभर पुरेल इतकी चटणी घरी तयार करून ठेवण्याची परंपरा सर्वत्र असल्याने गृहिणीं बाजारात मिरची खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


 तर या वर्षी मिरचीचे भाव कधी चढ तर कधी उतार तर कधी गगनाला भिडल्याने आर्थिक बजेट जुळवताना पुरुष मंडळींची दमछाक होत आहे. 


भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागातील कडगाव येथे पन्नास पेक्षाही जास्त खेडे-गावांची दर शुक्रवारी मोठी बाजारपेठ भरत असते . याशिवाय पाटगाव,तांबाळे, वेसर्डे, येथे ही छोट्या-मोठ्या बाजारपेठ असतात मात्र या बाजारात लाल मिरचीची आवक कमी प्रमाणात असते, प्रामुख्याने गारगोटी,व कडगाव येथेच लाल मीरचीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते.घरगुती वापरासाठी व लग्नसराई यामुळे बाजारात लाल मिरचीची मागणी लक्षणीय वाढली आहे. मिरची बाजारात सहज नजर टाकली तर मिरचीचे भावही गगनाला भिडले असल्याने तिखटपणा ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झोंबत असल्याचे दिसते.


बाजारात ३५० ते ६०० रुपये प्रतिकिलो असे लाल मिरचीचे भाव आहेत. दैनंदिन आहारात लाल मिरचीचा समावेश अनिवार्य असतो. जेवण झणझणीत व चवीचे व्हायचे असेल, तर लाल तिखटाला पर्याय नाही. लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. देशातील ८० टक्के लोक आजही बाजारपेठेतील मनासारखी आवडणारी लाल मिरची विकत घेऊन ती कांडप वापरणेच पसंत करतात. सुमारे २० टक्के लोक, यात हॉटेल व्यावसायिक व नोकरदार मंडळी तयार तिखट खरेदी करतात.


शरीराची सुस्ती घालवण्यासाठी, तसेच शरीर तरतरीत ठेवण्यासाठी व निद्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी आहारात लाल मिरचीचा वापर केला जातो. लाल मिरचीचे असंख्य प्रकार आहेत. घरगुती मागणी असणाऱ्या प्रकारांत बेडगी, गुंटूर, तेजा, संकेश्वरी या मिरचीचा समावेश होतो. नव्याने विविध संकरीत जातीही बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. 


 बेडगी मिरची रंगास भडक, सौम्य तिखट, भरपूर चवदार व स्वादिष्ट असल्यामुळे कमी तिखट खाणारे लोक व तारांकित हॉटेलमध्ये या मिरचीला चांगली मागणी आहे. 


महाराष्ट्रात पिकणारी गावरान मिरची तिखट असते. पण तिचा रंग जास्त दिवस टिकत नाही. या मिरचीस त्या त्या हंगामात मागणी असते. त्यामुळे शेतकरी हिरवी मिरची विकण्यावरच प्रामुख्याने भर देतात. आंध्रातील प्रमुख बाजारपेठेतून फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिरचीची आवक मोठय़ा प्रमाणात होते असते. तिरवडे येथील मिरची व चटणी व्यावसाईक चंद्रकांत पाटील कडगांव येथे लावलेल्या दुकानावर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.


फोटो-भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे विक्रीस लावलेल्या लाल मिरच्या विक्रेते प्रवीण पाटील व चंद्रकांत पाटील व ग्राहकांची गर्दी

Post a Comment

0 Comments