Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मूर्ती संवर्धनानंतर श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या दर्शनाला सुरुवात.

 मूर्ती संवर्धनानंतर श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या दर्शनाला सुरुवात.

कोल्हापूर दि. १६ :  श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मुर्तीची संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभाग शाखा, औरंगाबाद यांचेकडील अधिकारी यांचे मार्फत दि. १४ व १५ एप्रिल रोजी पूर्ण करणेत आली. त्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वा. धार्मिक विधी सुरू करण्यात आला. धार्मिक विधी सकाळी १०.३० वा. पूर्ण झालेनंतर पुर्वी प्रमाणे पितळी उभंऱ्याच्या आत भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. धार्मिक विधी वेळी काही कालावधी करीता जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर अमोल येडगे तसेच सचिव सुशांत बनसोडे हजर होते. मुर्ती दर्शनासाठी खुली केलेनंतर ४३,२३६ इतक्या भाविकांनी दर्शन घेतले अशी माहिती सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments