श्री शिवाजी विद्यालय व क. महाविद्यालय,येवता शाळेमध्ये मानव विकास मिशन अंतर्गत.....शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

 श्री शिवाजी विद्यालय व क. महाविद्यालय,येवता शाळेमध्ये मानव विकास मिशन अंतर्गत.....शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर 

----------------------------------

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी विद्यालयाचे येवता चे अध्यक्ष मह्त शांतीपु्री महाराज होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिमच्या अध्यक्षा मा. अनिताताई सरनाईक साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच स्थानिक शाळा समितीचे सर्व संचालक मंडळ कार्यक्रमास उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक अभिभाषणामध्ये शाळेचे प्राचार्य मा. विजयकुमार ढेंगळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात, याबद्दल उपस्थित पालकांना माहिती दिली. आपल्या प्रमुख भाषणामध्ये मा.सौ. अनिताई सरनाईक यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशीम अंतर्गत शाळा कशाप्रकारे बहुजनांच्या, तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा पुरवीत आहे या बद्दल माहिती दिली. यासोबतच शाळेतील गुणवता वाढविण्यावर सर्वांनी एकजुटीने भर द्यावा अशे गौरवोद्गार काढले. यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये महंत शांतिपु्री महाराज यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यानंतर शाळेतील वर्ग८वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत मिळालेल्या सायकल्स् पालकांसमक्ष मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. या कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थि उपस्थित होते..कार्यक्रमाचे संचालन श्री.काठोळे सर यांनी तथा आभार प्रदर्शन श्री रोही सर यांनी केले.याप्रसंगीचे काही क्षणचित्रे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.