Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उचगांव हायवे उड्डाणपुलाचे पाडकाम यात्रा काळात नको.

 उचगांव हायवे उड्डाणपुलाचे पाडकाम यात्रा काळात नको.

-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरण विस्तारीकरणाचे काम सुरू अहे.त्यात उचगांव उड्डाणपूल व सरनोबतवाडी येथील पुल पाडण्यात येणार आहे. यात्रा काळात हे पाडकाम जर हाती घेतले तर वाहतुक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. उचगांव येथील ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाची त्रेवार्षीक यात्रा कोरोनाच्या कालावधीतनंतर दिनांक१९ एप्रिल २०२४ ते २४ एप्रिल २०२४ रोजी संपन्न होत असून येथे पंचक्रोषितील तसेच जिल्हयातील मोठया संख्येने भाविकांसह पै-पाहुण्यांचा राबता हा यात्रा काळामध्ये मोठयाप्रमाणात उचगांव मध्ये असतो. उचगांव मुख्य प्रवेशव्दारामधुन उचगांव मध्ये येण्यासाठी मोठी वाहतुकीची कोंडी होत असल्याने पर्यायी मार्ग म्हणून हायवे पुलाखालुन उचगांवपुर्वेकडून गावामध्ये वाहतुक होत असते, उचगांवचे मंगेश्वर मंदीर हे मुख्य रस्ताच्या बाजुला असल्याने पुर्वेकडून हायवेच्या बाजुने ये-जा मोठया प्रमाणात होते. त्यामुळे उचगाव व सरनोबतवाडी भुयारी पुलाचे पाडकाम पुढ़े ढकलण्यात यावे ही करवीर शिवसेना उध्दवबाळासाहेब ठाकरे पक्षाची व उंचगाव ग्रामपंचायतची मागणी आहे.*

*तरी पूढ़ील पाडकाम हे यात्रे नंतर करण्याबातच्या सुचना आपल्या खात्याकडून संबंधीत कॉन्ट्रक्टरांना द्याव्यात तसेच भक्तांची व नागरीकांची गैरसोय टाळावी.*

  *यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, उंचगावच्या मुख्य रस्त्यावर मुख्य यात्रा भरत असल्याने, जे भाविक बाहेरून येतात ते जास्त करून महामार्गाच्या सेवा मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यांवर गटारी काढण्यासाठी जे रस्त्ते खोदले आहेत ते मुजवावेत.*

   *सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले की, खुदाईमुळे रस्ता अपुरा झाला आहे तरी किमान पूर्वी जशी दोन वाहने पास होत होती तसा रस्ता करावा अन्यथा केलेली खुदाई मुजवावी.*

   *या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना व उंचगाव ग्रामपंचायतच्या वतीने मा. सी.बी.भरडे, अभियंता ,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग, प्राधिकरण, उजलाईवाडी,ता.करवीर, जि.कोल्हापूर यांना देण्यात आले*

 *यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसात रस्त्याची पाहणी करून वाहतुकीस अडथळा होणार नाही व यात्राकाळात भाविकांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी उपययोजना करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले*

  *यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव सरपंच मधुकर चव्हाण, पोपट दांगट, दिपक रेडेकर, वीराग करी, राहुल मोळे, योगेश लोहार,संतोष चौगुले, कैलास जाधव,अरविंद शिंदे,अनिकेत लांडगे, श्रीधर कदम, सूरज पाटील आदी उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments