Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा शहरात रामनवमी निमित्त मोटारसायकल रॅली.

 लोहा शहरात रामनवमी निमित्त मोटारसायकल रॅली.

-----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार

-----------------------------

       प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त बुधवारी श्री बागेश्र्वर धाम सेवा समितीच्या वतीने लोहा शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी राम भक्तांनी हातात भगवी पताका घेत 'प्रभू रामचंद्र की जय' ' 'जय श्रीराम' घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

              श्री बागेश्वर धाम सेवा समितीच्या पुढाकारातून दि. १७ रोजी बुधवारी लोहा शहरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी जुना लोहा शहरातील मारोती मंदिरात पूजा विधी पार पाडण्यात आला. वाहनावर प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून सेवा समितीचे अध्यक्ष अंबादास पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅली शिवाजी महाराज पुतळा, नळगे विद्यालय, मशिद, विठ्ठलवाडी, नागरेश्वर मंदिर, भाजी मंडई, बाजार कमान, मोंढा मार्गे शिक्षक कॉलनी येथील श्रीराम मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी कॉलनीतील श्रीराम मंदिरात ह भ प भालेराव गुरुजी यांचे हरी कीर्तन झाले. तर मंदिर संस्थांनचे अध्यक्ष नगरसेवक भास्कर पाटील पवार यांच्या वतीने अन्नदान देण्यात आले. यावेळी पुरूनाथ महाराज, नगरसेवक भास्कर पाटील पवार, गणेश कल्याणकर, माजी नगरसेवक पंकज परीहार, कृ. भा. जाधव, बालाजी कळकेकर, नागनाथ भुताळे, लक्ष्मीकांत कदम, ओमकार खोडवे, गणेश मोरे, दिलीप पवार, गुणाजी ढेंबरे, रवी वाघमारे, हणमंत मस्किकर,योगेश चींतेवार, सुधीर अंबेकर, दीपक कंधारकर, गुलाब यादव, गोविंद ढगे, योगेश कुटे, राहुल धुडके, पवन धोंगडे, चंदू यादव आदींसह बहुसंख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments