Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून हाजगोळी येथील प्रकार.

 शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून हाजगोळी येथील प्रकार.

---------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार.

----------------------------

चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजगोळी गावचे शेतकरी वसंत पाटील शेतातील काजू गर गोळा करण्यासाठी हाळ नावाच्या शेतामध्ये गेले असता शेतीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने आपल्या चुलत्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली

या घटनेची अधिक माहिती अशी की 

काही दिवसांपूर्वी वसंत पाटील हे रानामधील काजू गर गोळा करण्यासाठी हाळ नावाच्या शेतामध्ये गेले असता त्यांचा पुतण्या वैरण आणण्याकरता हा पण हाळ नावाच्या शेतामध्ये गेला होता त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये डोंगराकडील सामायिक जमीनीवरून वाद झाला या वादातून पुतण्याने वसंत पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करत गंभीर जखमी करून जवळच असलेल्या एका खोपी मधील कोयता घेऊन त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जागीच ठार मारले त्यानंतर मयत पाटील त्यांचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला

Post a Comment

0 Comments