Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लग्नमुहूर्त कमी मतदान होण्याचे एक कारण?

 लग्नमुहूर्त कमी मतदान होण्याचे एक कारण?

-------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकूर 

-------------------------------------

नवरदेव मतदानाला आणि वऱ्हाडी लग्नाला. 

रिसोड(लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल शुक्रवारी पार पडले.मतदानाची प्रत्येक लोकसभा मतदार संघातील टक्केवारी अपेक्षेपेक्षा फार कमी राहली. प्रशासकीय स्तरावरून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. मतदारांची उदासीनता, चुकीच्या राजकीय वातावरणाची आलेली चीड यामुळे मतदार आपला अधिकार वापराण्यासाठी बाहेर निघालाच नाही तर गावाखेड्यातील रोजगारासाठी स्थलांतरित मतदार सुद्धा आले नाही ही सर्व कारणे मतदान कमी होण्याची  कारणे वाटत असली तरी 26 एप्रिलच्या दिवशी लग्न मुहूर्त असल्यामुळे प्रत्येक गावात लग्न समारंभ होते किंवा नात्यागोत्यातील लग्नाला जाणारा वर्ग फार मोठा होता. मतदानाला गेलं तर उशीर लागेल आणि लग्नाला जाणाऱ्या गाड्या निघून जातील म्हणून अनेक गावामध्ये मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली ही वास्तविकता आहे. अनेक नवरी नवरदेवानी लग्नाला जाण्यापूर्वी मतदान केले फोटो काढले प्रसार माध्यमानी त्यांना प्रसिद्धीही दिली. एकट्या नवरदेवाने मतदान केले मात्र इतर सर्व वऱ्हाडी नवरी नवरदेवाला आशीर्वाद देण्याच्या नादात मतदानाच्या कर्तव्याला बगल देऊन गेले.प्रशासकीय स्तरावरून मतदान होण्यासाठी जसे प्रयत्न केले जातात तसेच सामाजिक स्तरावरून सुद्धा होणे अवश्य आहे. लग्न तिथी नसती किंवा मतदानाच्या दिवशी लग्न न ठेवता इतर दिवशी लग्न केले असते तर किमान दहा टक्के मतदानात भर पडली असती हे तेवढंच खरं आहे. आता वेळ गेली परंतु भविष्यात शासन जशी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करते तशी लग्न समारंभ व इतर सार्वजनिक मोठे कार्यक्रम रद्द करण्याची ताकीद द्यावी किंवा मंगल कार्यालय तथा आणखी जे या प्रक्रियेत सहभागी होतात त्यांच्यावर मतदानाच्या दिवशी सार्वजनिक समारंभ आयोजित कारण्यास प्रतिबंध करावा आणि सोबतच सामाजिक प्रबोधन करण्यावर भर दिला तर मतदान अधिक होईल.आता लोकसभेला हे शक्य वाटत नसले तरी विधानसभेला वऱ्हाडी म्हणून कोणी कुठेही मतदान केल्यायाशिवाय जाणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी तरच मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

Post a Comment

0 Comments