Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड-मालेगाव विधानसभा क्षेत्रात मालेगाव तालुक्यात आंबेडकरांना तर रिसोड तालुक्यात धोत्रेना आघाडी?

रिसोड-मालेगाव विधानसभा क्षेत्रात मालेगाव तालुक्यात आंबेडकरांना तर रिसोड तालुक्यात धोत्रेना आघाडी?

-----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजितसिंह ठाकुर

-----------------------------------

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिलला मतदान पार पडले. अकोला लोकसभा मतदार संघात अकोला जिल्ह्याबाहेरील वाशीम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव हा विधानसभा मतदार संघ येतो.या विधानसभा मतदार संघाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अकोला जिल्ह्यातील मतदार संघापेक्षा थोडी विसंगत आहे.त्यामुळे येथील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत राहतात. येथील मतदार पक्षनिष्ठा पेक्षा व्यक्तींनीष्ठा जोपसतात त्यामुळे मतदार कधीच कोण्या एका पक्षाच्या बाजूने आहे असे सांगता येत नाही.

 आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तिघांपैकी कोण निवडून येईल हे सध्यातरी सांगणे कठीण आहे परंतु निवडून येणाऱ्याचे मताधिक्य फार कमी म्हणजे पंचवीस तीस हजारापेक्षा अधिक असणार नाही एवढी ही काट्यावरची लढाई आहे. तिन्ही उमेदवाराचे कार्यकर्ते वरुनवरून आपलाच विजय सांगत असले तरी आतून मात्र कमालीचे घाबरलेले आहेत.रिसोड मालेगाव विधानसभा सभेतील मतदारांची उमेदवाराला

 निवडून आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे.हा विधानसभा मतदार संघ पारंपरिक काँग्रेसचा गड राहला आहे विद्यमान आमदार अमित झनक यांनी मोदी लाटेतही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.लोकसभेचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांना काँग्रेसच्या गोटातून भक्कमपणे साथ मिळाली आहे त्यांना अल्पावधित आमदार झनक यांच्यामुळे मोठा प्रतिसाद मिळाला परंतु अनुप धोत्रे आणि ऍड प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा ते मतांच्या बाबतीत पिछाडीवर राहण्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. रिसोड तालुक्यात भाजपचे अनुप धोत्रे यांना यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फायदा होताना दिसत आहे. अनुप धोत्रे किंवा त्यांचे वडील खासदार संजय धोत्रे यांचे फार काही काम नसले तरी भाजपच्या अबकी बार चारशे पार यासाठी त्या चारशे मध्ये मोदींच्या सोबत आपला प्रतिनिधी दिसावा या उद्देशाने लोकांनी पुनः कमळ निशाणी वर मतदान केले. अकोला लोकसभा मतदार संघात अनुप धोत्रेना आघाडी मिळेल किंवा नाही हे अनिश्चित असले तरी रिसोड तालुक्यात मात्र अनुप धोत्रे आपल्या प्रतिस्पर्धी पेक्षा जास्त मते घेऊन आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अकोला लोकसभेचे उमेदवार ऍड प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात मागच्या पेक्षा यावेळी मुसंडी मारली आहे नव्हे ते विजयाचे दावेदार मानले जात आहेत. त्यांचा अकोला पॅटर्न यावेळी प्रभावी ठरत असल्याचे चिन्ह आहेत. त्यांनी तयार केलेल्या पॅटर्नची जुळवाजूळव जमली तर त्यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही. परंतु अकोला पॅटर्न वाशीम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव मतदार संघात फारसा प्रभावी ठरत नसला तरी ऍड आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर व सुजात आंबेडकर यांनी रिसोड मालेगाव विधानसभा क्षेत्रात केंद्रित केलेले लक्ष महत्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी गावोगावी जाऊन फार आधीपासून प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून राहाला.गावखेड्यातील मतदारांनी आंबेडकर यांच्या बाजूने फार प्रामाणिकपणे मतदान केले. मालेगाव तालुक्यात ऍड प्रकाश आंबेडकर यांना धोत्रे आणि डॉ. पाटील यांच्यापेक्षा आघाडी मिळण्याचा अंदाज राजकीय विश्लेष्कानी व्यक्त केला आहे. रिसोड मालेगाव विधानसभा क्षेत्रात धोत्रे आणि ऍड आंबेडकर यांच्यात लढत राहील तर काँग्रेसचे डॉ.पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहतील परंतु मतांचा फरक जास्त असणार नाही त्यामुळे तिरंगी लढतीत रिसोड-मालेगाव विधानसभा सभेतील मतदार निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या विजयात निर्णायक ठरेल.

Post a Comment

0 Comments