केशवनगर परिसरात अवकाळीने शेतकऱ्याचे कांदा पिकाचे नुकसान.
केशवनगर परिसरात अवकाळीने शेतकऱ्याचे कांदा पिकाचे नुकसान.
आंब्याचे झाड ही कोसळले रणजीत ठाकूर रिसोड प्रतिनिधी रिसोड तालुक्यातील ग्राम केशवनगर येथील शेतकरी रमेश महादू सरोदे व सुरेश महादु सरदे यांच्या शेतातील केशवनगर परिसरातील गट नंबर 38 मधील शेतातील कांदा पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे ,सविस्तर वृत्त असे की काल रात्री रात्री दोन वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस हवेमुळे व वादळी वाऱ्यामुळे सुरेश महादेव सरोदे व रमेश महादू सरोदे यांच्या शेतातील केशवनगर परिसरातील गट नंबर 38 मधील बियाचा कांदा पूर्णपणे उखडून पडला व हवेमुळे कांद्याचे गेंद खाली वाकल्यामुळे ते व पावसामुळे भिजल्या पावसाने त्याची नको ती हेळसांड झाली ,त्यामुळे कांद्याचे पीक होत्याचे नव्हते झाले ,यावेळी सदर शेतकऱ्याने गेल्या तीन-चार महिन्यापासून घेतलेल्या मेहनतीवर अखेर पाणी करणार काय असा भावनिक सवाल शेतकरी सुरेश महादेव सरोदे व रमेश महादेव सरोदे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला तसेच शेतातील आंबा सुद्धा मोडून पडल्यामुळे पिकण्याआधीच आंबा सुद्धा शेतकऱ्यांना खायला मिळणार नाही सदर बाबीची दखल अद्याप महसूल प्रशासनाने घेतले नाही, त्यामुळे महसूल प्रशासनाने या कांदा पिकाचा तात्काळ सर्वे करून शेतकरी सुरेश महादु सरदे व रमेश महादू सरोदे यांना शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी समंधीत शेतकऱ्यांनी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली
Comments
Post a Comment