हातकणंगले तहसीलदार कार्यालयाकडून, तृतीयपंथीयांना पिवळे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच लाभार्थी कार्डच वाटप.

हातकणंगले तहसीलदार कार्यालयाकडून, तृतीयपंथीयांना पिवळे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच लाभार्थी कार्डच वाटप.

हातकणंगले तहसीलदार कार्यालय यांच्याकडून, तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना अंतोदय पिवळे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे मंजुरी पत्र याचे आज वाटप करण्यात आले.तहसीलदार कल्पना ढवळे आणि मैत्री संघटनेच्या अध्यक्ष

मयूरीताई आळवेकर यांच्यामध्ये बाकीच्या वंचित घटकातील सदस्यांसाठी जसं की एकल महिला, तृतीयपंथी, एड्सग्रस्त आजारी व्यक्ती ,वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, तमाशागीर कलाकार यांच्यासाठी सुद्धा कागदपत्रांच्या अटी शर्ती न लावता किमान कागदपत्रांमध्ये प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा यासाठी सहकार्याची भावना असावी यावरती चर्चा झाली कल्पना डोळे मॅडमनी याबद्दल आश्वासन देऊन कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.मैत्री संघटनेने घेतलेले कष्ट आणि सततच्या पाठपुराव्यामुळ तृतीयपंथी यांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा योग्य समाजात समाजभिमुख आणि सन्मानाची वागणूक मिळताना दिसत आहे.

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अंजना कांबळे,कार्यकारी सदस्य तसेच मैत्री संघटनेचे अध्यक्ष मयूरीताई आळवेकर आणि तृतीयपंथी समुदायातील मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.