त्रिरत्न बौद्ध महासंघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
त्रिरत्न बौद्ध महासंघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
--------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधी
--------------------------
त्रिरत्न बौद्ध महासंघ सातारा, केंद्राच्या वतीने त्रिरत्न बौद्ध महासंघाचा ५७ वा वर्धापन दिन जेतवन बुद्ध विहार गोडोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
धम्मचारी संघादित्य यांनी भंते उर्गेन संघरक्षितजी यांनी स्थापन केलेल्या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन धम्मचारी संघादित्य व पंचशील प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. गाथापठन महिला व धम्ममित्रांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धम्ममित्र किशोर जाधव यांनी केले तर धम्ममित्र विश्वास सावंत यांनी आभारप्रदर्शन केले. उपस्थितांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला.याकामी, सर्व धम्ममित्र महिला, पुरुष, धम्म सहाय्यक व बालमित्र यांनी अथक असे परिश्रम घेतले.
फोटो : मार्गदर्शन करताना धम्मचारी संघादित्य शेजारी मान्यवर.
Comments
Post a Comment