Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आग लागून मोठे नुकसान.

 शिरोली औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आग लागून मोठे नुकसान.

------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

------------------------------

शिरोली औद्योगिक वसाहतीतील श्री दत्त फौंडर्स ॲन्ड इंजिनिअर्स कंपनीत गुरुवारी, सायंकाळी शाॅर्ट सर्कीट मुळे

 ट्रान्सफाॅर्मरला आग‌ लागली या आगीत कंपनीचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा झाली नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. 

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी शिरोली औद्योगिक वसाहतीतील बी ब्लाॅक मध्ये उद्योजक सुरज बोडके यांची श्री दत्त फौंडर्स ॲन्ड इंजिनिअर्स ही कंपनी आहे. नेहमी प्रमाणे कंपनीत काम सुरू होते. सायंकाळी ५ च्या सुमारास कंपनी समोरील ट्रान्सफाॅर्मर मध्ये शाॅर्ट सर्कीट होवून आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आणि आगीचे लोट बाहेर पडू लागले. कंपनीत आग लागल्याने कंपनीतील कार्यालयीन कर्मचारी आणि फौंड्री मधील कर्मचारी कंपनीतून बाहेर आले. 

आग आटोक्यात आणण्यासाठी कंपनी प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले.‌ कसबा बावडा येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आल्यावर या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. 

पण तोपर्यंत कंपनीचे बाहेरील बाजूचे संपूर्ण नुकसान झाले होते. यामध्ये श्री दत्त फौंडर्स ॲन्ड इंजिनिअर्स चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी शिरोली पोलीस, महावितरण कंपनीचे कर्मचारी आले होते. यावेळी कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments