लोहा तालुक्यातील पोलेवाडीचे नाव गाजणार भारतभर धुळगुंडे महाराज पोस्टाच्या तिकिटावर.

 लोहा तालुक्यातील पोलेवाडीचे नाव गाजणार भारतभर  धुळगुंडे महाराज पोस्टाच्या तिकिटावर.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

-----------------------------

सामाजिक , शैक्षणिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे लोहा तालुक्यातील‌ जेष्ठ नेते मौजे पोलेवाडीचे भूमीपुत्र नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे महाराज यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल भारत सरकारने घेऊन भारतीय डाक विभागाच्या टपाल तिकिटावर त्यांचा फोटो छापून फार मोठा सन्मान केला आहे

 त्यामुळे संभाजीराव धुळगुंडे महाराज यांचे नाव भारतभर गाजणार आहे.

संभाजीराव धुळगुंडे महाराज हे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तसेच प्रति माहुर येथील श्री रेणुका देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलेवाडी येथील पोलेवाडी गडावरील श्री रेणुका देवी देवस्थान संस्थानाचे ते अध्यक्ष आहेत तर संस्थानकाचे संस्थापक एन एन देशपांडे साहेब आहेत तर कोषाध्यक्ष बाबुराव शकरवार साहेब आहेत.दरवर्षी येथे नवरात्र महोत्सवात श्री रेणुका देवी ची यात्रा भरवितात भजन, किर्तनाचे, कब्बडी , कुस्त्या,हाॅलीबाल, स्पर्धेचे आयोजन करतात तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करतात या यात्रेला लोहा, कंधार,अहमदपुर,पालम, उदगीर,लातुरसह आंध्रप्रदेश, तेलंगणाचे भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात या यात्रेचे नियोजन संभाजीराव महाराज धुळगुंडे उत्कृष्टपणे करतात ते नऊ दिवस श्री रेणुकागडावरच राहतात. तसेच ते दरवर्षी सलग 9 वर्षांपासून माळेगाव ते चौंडी रथयात्रा काढतात.

 तसेच पोलेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ही आहेत.

  संभाजीराव धुळगुंडे महाराज हे मध्ये पेनूर सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जि.प. सभागृहात उमटविला . त्यांच्या कार्याची दखल घेत देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण साहेब यांनी संभाजीराव धुळगुंडे यांना 


 पुढे चालून 1999 ते 2001 दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले.

त्यांच्या जि.प. अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागात विकास कामे मोठ्या प्रमाणात केलेत. त्यांनी राष्ट्रीय पंचायतराज समितीच्या बैठकीत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. आपला भारत देश हा खेड्यांचा देश असून खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल हे त्यांनी सांगितले.   

तसेच संभाजीराव धुळगुंडे महाराज यांनी सामाजिक क्षेत्रात ही अनेक उपक्रम राबविलेत तसेच धार्मिक क्षेत्रात ही त्यांचे कार्य वयाच्या 76 व्या

वर्षी ही चालूच आहे.

 सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान व्हावा त्यांचा आदर्श समाजाने व भावी पिढीने घ्यावा यासाठी केंद्र सरकारच्या मध्यप्रदेश बालाघाट येथील संस्थेने युनो सारख्या असणाऱ्या अंतरराष्ट्रीय संस्थेने आपल्या भारत देशातील व्यक्तीचा व त्यांच्या कार्याचा सर्व्हे करुन भारतीय डाक विभागाच्या टपाल तिकिटावर विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान व्हावा म्हणून त्यांचे पोस्टाच्या तिकिटावर फोटो छापले आहेत.

 यात आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लोहा तालुक्यातील पोलेवाडीचे भूमीपुत्र संभाजीराव धुळगुंडे महाराज यांचा ही फोटो ५०० पैशाच्या तिकिटावर छापला आहे त्यामुळे संभाजीराव धुळगुंडे महाराज यांचा फार मोठा सन्मान करण्यात आला आहे. सदरील तिकिटाचे वितरण जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारत देश भर होणार आहे. त्यामुळे आपल्या लोहा तालुक्यातील पोलेवाडीचे नाव गाजणार भारतभर संभाजीराव धुळगुंडे महाराज हे राहणार आहेत पोस्टाच्या तिकिटावर

त्यामुळे संभाजीराव धुळगुंडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ईश्वर संभाजीराव धुळगुंडे महाराज यांना चांगले निरोगी व दिर्घ आयुष्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो भारतीय डाक विभागाच्या तिकिटावर त्यांची फोटो केंद्र सरकारने छापून त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल त्यांना खुप खुप शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.