Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वळीवडेचे तलाठी तडकाफडकी निलंबित, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष.

 वळीवडेचे तलाठी तडकाफडकी निलंबित, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापुर जिल्हा प्रतीनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------------

निवडणूक कामात अनुपस्थित राहिला म्हणून करवीर तहसील मधील वळीवडे येथील तलाठी प्रवीण शेजवळ यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी पसरले आहे. निलंबन कारवाईच्या या टोकाच्या कृतीने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा निर्णय कोणालाही पटला नसल्याचे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी करवीर उपविभाग यांनी निलंबित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, आपणास मतदान यंत्र तयार करणे कामी आदेशित करण्यात आले होते. सदर आदेशान्वये आपण नेमून दिलेले कामकाज पूर्ण होईपर्यंत हजर राहणे आवश्यक होते, तथापि आपण सदर कामकाजाच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार हरेश धार्मिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 47-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 274 कोल्हापूर दक्षिण विभाग मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी यांनी प्रवीण शेजवळ तलाठी, वळीवडे तालुका करवीर यांना २८ एप्रिल २०२४ रोजी निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबन आदेशावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments